Showing posts with label Posters (Social Personalities). Show all posts
Showing posts with label Posters (Social Personalities). Show all posts
Saturday, September 19, 2015
Shepherd Boy Chandragupta Maurya
Thursday, September 17, 2015
Periyar E. V. Ramasamy
Wednesday, September 16, 2015
Friday, May 29, 2015
पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर
Sunday, March 15, 2015
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर
Wednesday, November 12, 2014
Bapu Biru Vategaonkar (बापू बिरू वाटेगावकर)
Friday, November 7, 2014
Saint Kanakadasa (संत कनकदास)
भारत ही साधू-संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. सर्वच धर्माच्या अनेक साधू संतांनी आपापल्या काळात समाज प्रबोधनाचे कार्य मोठया प्रमाणावर केले. त्यांनी लिहून ठेवलेले साहित्यग्रंथ आजही त्याची प्रचीती देतात. कर्नाटकातील अशाच एका महान संताचा हा संक्षिप्त जीवन आढावा…
संत कनकदास : एक संत, कवी, तत्वेत्ते तसेच रचनाकार म्हणून त्यांची ओळख अवघ्या देशाला आहे. संत कनकदासांचा जन्म सध्याच्या कर्नाटक राज्यातील बाड (ता-शिगाव, जि-हावेरी) येथे १५०९ साली एका कुरुबा (धनगर) कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिराप्पा तर आईचे नाव बचम्मा होय. संत कनकदासांचे मूळ नाव हे थिमाप्पा होते. तरुणपणात थिमाप्पांना एक खजिना मिळाला होता,त्याचा त्यांनी स्वतःसाठी उपयोग न करता समाजकार्यासाठी तो देऊ केला. त्याचमुळे थिमाप्पा यांना कनकदास (कनक=सुवर्ण) या नावानी ओळखले जाऊ लागले.
त्यांचे समाजीक एकात्मतेचे कार्य हे खरंच सर्वांना अजूनही प्रेरणादायी असेच आहे. संत कनकदासांनी आपल्या जीवन काळात अनेक कीर्तने, सामाजिक-धार्मिक गीते तसेच रचना रचल्या. त्यातील नलचरीत्र, हरीभक्तीसार, नृसिंहस्तव, रामधन्यचरीत्र आणि मोहनतरंगिनी या त्यांच्या प्रमुख रचना मानल्या जातात. या व्यतिरिक्तही त्यांनी शेकडो कीर्तने तसेच सामाजिक-धार्मिक गीते रचली व समाजीक एकात्मतेसाठीच जीवन अर्पिले.
सदैव लोककल्याणाचा विचार करणाऱ्या संत कनकदासांनी तिरुपती येथे जीवनातील शेवटचे दिवस घालवले. १६०९ मध्ये ह्या महान संताचा, कवीचा, तत्वेत्याचा तसेच एका महान रचनाकाराचा मृत्यू झाला. त्यांचा शारीरिक मृत्यू झाला असला तरीही संत कनकदासांचे वैचारिक रूप आजही जनमाणसांत जिवंतच आहे.
चित्रपट सृष्टीलाही संत कनकदासांच्या विचारांची ओढ लागली नाही असे नाही. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. राजकुमार यांच्या अभिनयाने नटलेला 'भक्त कनकदास' हा १९६० सालचा कन्नड चित्रपट त्या काळात अतिशय लोकप्रिय ठरला. तसेच अनेक गीते व नाटके यातून आजही संत कनकदासांचे कार्य समाजापुढे आणन्याचा प्रयत्न सुरूच असतो.
त्याचबरोबर संत कनकदासांच्या कार्याचा एक सन्मान म्हणून कर्नाटक राज्य सरकारने 'कनकदास जयंती' रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. तसेच त्या दिवशी संपूर्ण राज्यभर सर्वच छोटया-मोठया गावात-शहरांत विविध कार्यक्रमांचे तसेच मिरवणूकींचे आयोजन केले जाते व संत कनकदासांच्या विचारांचा जागर मांडला जातो.
अशा एका थोर संताच्या विचारांचा उपयोग राज्याच्या अथवा भाषेच्या सीमा न घालता सर्व समाजांच्या प्रबोधनासाठी केला जावा हीच अपेक्षा…!
- मिलिंद डोंबाळे
Thursday, November 6, 2014
Maharaja Yashwant Rao Holkar
Guru Nanak Dev Ji...!
Tuesday, October 7, 2014
Maharshi Valmiki (महर्षी वाल्मिकी)
Thursday, December 5, 2013
Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar
Monday, December 2, 2013
Samrat Harihara & Bukkaraya (सम्राट हरिहर आणि बुक्काराय)
दक्षिण
भारतात सुलतानी आक्रमकांना निस्तेज करणारे, तेराव्या शतकात स्वातंत्र्य
साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे, भारताच्या गौरवशाली इतिहासात अजरामर
झालेले, विजयनगर साम्राज्याचे संस्थापक, कुरुबा-धनगर कुलावतंस सम्राट
म्हणजेच सम्राट हरिहर आणि बुक्कराय !
संपूर्ण दक्षिण भारतावर सुमारे तीनशेहून अधिक वर्षे राज्य करुन भारतीय
इतिहासात एक गौरवशाली सुवर्ण काळ ठरलेले साम्राज्य म्हणजेच - विजयनगर
साम्राज्य ! उत्तरेकडील सुलतानांचा धोका ओळखून १३३६ साली दक्षिण भारतात
हरिहरराय व बुक्कराय या दोन कुरुबा-धनगर बंधूनी विजयनगर साम्राज्याची
स्थापना केली. पुढे जाऊन याच साम्राज्याने संपूर्ण दक्षिण भारतात सुमारे ३१० वर्षे
राज्य केले. कला, संस्कृती, साहित्य व स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने
आपल्याला इथे पहावयास मिळतात. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले नगर
(म्हणजे आत्ताचे कर्नाटक राज्यातील हंपी) आजही त्यावेळच्या वैभवाची साक्ष
देतात. या ऐतिहासिक शहराला युनेस्कोने 'जागतिक वारसा स्थान' (World
Heritage Site) म्हणून घोषित केलेले आहेच. पंधराव्या शतकात भारताच्या भेटीस
आलेल्या आणि विजयनगर साम्राज्याला भेट दिलेल्या अनेक पर्यटकांनी देखील
येथील वैभवाचे वर्णन नोंद करून ठेवले आहे. साहित्य क्षेत्रात कन्नड, तमिळ,
तेलुगू व संस्कृत या भाषांना एक नवी उंची प्राप्त करून देण्यास ह्या
साम्राज्याचे मोलाचे योगदान मिळाले. भारतीय इतिहासात आपला एक वेगळा ठसा
उमठवणारे, पंधराव्या शतकातील कृष्णदेवराय हे राजाही ह्याच साम्राज्यातील.
विजयनगर साम्राज्याबद्दलची काही उपलब्ध माहिती संक्षिप्त स्वरुपात;
- साम्राज्य - विजयनगर साम्राज्य
- शासनकाळ - १३३६ ते १६४६
- धर्म - हिंदू
- भौगोलिक स्थान - दक्षिण भारत
- भाषा - कन्नड, तमिळ आणि तेलुगू
- राजघराणी - संगमा, सालुव, तुलूव व अरविदू
राजघराणी, संबधीत राजें आणि त्यांचा कार्यकाल यांची उपलब्ध माहिती खालील प्रमाणे;
१. संगमा राजघराणे -
- हरिहरराय (प्रथम) : १३३६ - १३५६
- बुक्कराय (प्रथम) : १३५६ - १३७७
- हरिहरराय (द्वितीय) : १३७७ - १४०४
- विरूपाक्षराय: १४०४ - १४०५
- बुक्कराय (द्वितीय) : १४०५ - १४०६
- देवराय (प्रथम) : १४०६ - १४२२
- देवराय (द्वितीय) : १४२४ - १४४६
- रामचंद्रराय : १४२२
- वीरविजय बुक्कराय : १४२२ - १४२४
- देवराय (द्वितीय) : १४२४ - १४४६
- मल्लिकार्जूनराय : १४४६ - १४६५
- विरूपाक्षराय (द्वितीय) : १४६५ - १४८५
२. सालुव राजघराणे -
- नरसिंहदेवराय : १४८५ - १४९१
- तिम्मा भुपाला : १४९१
- नरसिंहराय (प्रथम) : १४९१ - १५०५
३. तुलूव राजघराणे -
- नरसानायक : १४९१ - १५०३
- वीरनरसिंहराय : १५०३ - १५०९
- कृष्णदेवराय : १५०९ - १५२९
- अच्युतदेवराय : १५२९ - १५४२
- सदाशिवराय : १५४२ - १५७०
४. अरविदू राजघराणे -
- अलियरामराय : १५४२ - १५६५
- तुरूमलदेवराय : १५६५ - १५७२
- श्रीरंग (प्रथम) : १५७२ - १५८६
- वेंकट (द्वितीय) : १५८६ - १६१४
- श्रीरंग (द्वितीय) : १६१४
- रामदेव : १६१७ - १६३२
- वेंकट (तृतीय) : १६३२ - १६४२
- श्रीरंग (तृतीय) : १६४२ - १६४६
एवढे गौरवशाली इतिहास भारतात घडून देखील आपण भारतीय मात्र त्याच इतिहासाबद्दल अनभिज्ञ व उदासीन आहोत, हीच खरी शोकांतिका…
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com
Saturday, November 30, 2013
Thursday, November 28, 2013
Sampat Pal Devi (Gulabi Gang)
Sachin Tendulkar
Wednesday, November 27, 2013
Veerangana Bhimabai Holkar (17-Sep-1795 To 28-Nov-1858)
भारतभूमी अजुनी गाती, शौर्यगीत या वीरांगनेचे
मर्दानी लढली इंग्रजांसवे, रक्षिण्या स्वातंत्र्य देशाचे
शोभे माता लाडाबाई, पिता महाराजा यशवंत
पण कैदेतल्या बालपणाचे, आले नशिबी दुर्भाग्य
महाराजांनी विजयी करुनी, हडपसरचे युद्ध
मुक्त केले जुलमी जाचातूनी, कुटुंब-कबिल्यास
सुटता पुण्यातील कैदेतूनी, सुरुवात झाली शिक्षणास
तलवारबाजी घोडेस्वारी सारख्या, लष्करी प्रशिक्षणास
होता उपवर भीमाई, आनंदे संपन्न झाला विवाह
पती लाभले सरदार बुळे घराण्यातील, गोविंदराव
पण नियतीने योजिला होता, एक नवा वेगळाच डाव
विवाहाच्या फक्त दोनच वर्षांत, माथी आले वैधव्य
पण दु:खाने हताश होईल ती, 'यशवंत-कन्या' कैसी ?
दु:ख सारुनी येऊनी मिळे, पित्याच्या स्वातंत्र्य कार्यासी
देखी तोफांचे कारखाने, होळकरी सैन्याची भरती
अश्व-निवडींवर देखील चाले, नियंत्रण भीमाबाई
सरता थोडा काळ, झाला आणखी एक आघात
हरवले पितृछत्र, महाराजा यशवंत स्वर्गवास
संधी साधून मोक्याची, गोरे फिरंगी प्रयत्न करीती
तरीही जिंकणे अशक्य होती, इंदुरची होळकरशाही
फिरंग्यांनी साधुनी कुटनीती, फोडले अनेक सेनानी
खून तुळसाबाईंचा करुनी, दिले प्रेत नदीत टाकुनी
काही दिवसातच तोंड फुटले, महिद्पुरच्या युद्धाला
पण त्यातही फितुरीचे काटे नडले, होळकरी सैन्याला
युद्धात महिद्पुरच्या, होळकरांनी केली शौर्याची बरसात
पण फितूर झालेल्या गफूरखानाने, रण सोडले ऐन जंगेत
विजय कमळ हातूनी निसटले, झाला तह इंग्रजासंगे
पण भीमाबाई तेथून निसटे, तीन हजार पेंढारी संगे
सदा राहुनी अरण्यवासी, गनिमीकावा मंत्र जपे
फिरंगी भयभीत असती, भीमाबाई करी गनिमी-हल्ले
फिरंग्यांचे खजिने लुटले, केली उध्वस्त अनेक तळे
हल्ले असती अति रांगडे, माल्कमही पळून जाये
पाठवी पत्रे सर्व राजांना, विनंती असे एकत्र लढयाची
प्रतिसाद नसे कोणाचा, तरी चालू ठेविला एकाकी लढा
माल्कमने टाकला मग नवा डाव, केला फितूर रोशनखान
धार नजीक असता तळ, केइरने केला हल्ला तत्काळ
हल्ला झाला चोहोबाजूंनी, पडली एकाकी ही वीरांगना
अखेर झाली कैद, करुनी ठेविले रामपुरा गढीत बंधिस्त
दुर्भाग्य जणू ह्या वीरांगनेचे, मृत्यूही आला कैदेत
विसावला भीमाबाई नावाचा, स्वातंत्र्यासाठीचा झंझावात
ठेऊनी जान त्या कर्तुत्वाची, घ्यावे राष्ट्रकार्य भीमाईचे समजुनी
नमोनि विंनती करे मिलिंद, सर्वांच्या चरणी ! सर्वांच्या चरणी !!

Monday, November 25, 2013
Chhatrapati Shivaji Maharaj
Sunday, November 24, 2013
The Great Saint Kanakadasa
Subscribe to:
Posts (Atom)

%2B-%2BThe%2BGreat%2BHolkars%2B-%2BMD2002211%2B-%2BShrimant%2BSubhedar%2BMalharrao%2BHolkar.jpg)
%2B-%2BMD20141113%2B-%2BBapu%2BBiru%2BVategaonkar%2B(%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%2B%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%82%2B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0).jpg)
%2B-%2BMD20141107%2B-%2BSaint%2BKanakadasa.jpg)
%2B-%2BThe%2BGreat%2BHolkars%2B-%2BMD20141106%2B-%2BH.%2BH.%2BMaharaja%2BYashwantrao%2BHolkar.jpg)
%2B-%2B2014045%2B-%2BGuru%2BNanak%2BDev%2Bji.jpg)
%2B-%2B2014044%2B-%2BMaharshi%2BValmiki%2B(%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%2B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80).jpg)
+-+MD02034A+-+Bharat+Ratna+Dr.+Babasaheb+Ambedkar.jpg)
+-+MD02034+-+Samrat+Haihara+&+Bukkaraya....jpg)
+-+MD02017-+Krantiveer+Sangolli+Rayanna.jpg)
+-+MD02020+-+Sampat+Pal+Devi.jpg)
+-+MD02029+-+Sachin+Tendulkar.jpg)
+MD00016+-+Mahatma+Jyotirao+Phule.jpg)
+-+MD02028+-+Veerangana+Bhimabai+Holkar.jpg)