प्राचीन काळांपासून पशुपालन करणारा समाज म्हणजे - धनगर समाज ! वैभवशाली आणि गौरवशाली इतिहास घडवणारा समाज म्हणजे - धनगर समाज ! आपल्या पशुपालन या पारंपारीक व्यवसायामुळे सर्वत्र पसरलेला व तेथील भाषेनूसार वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा समाज म्हणजे - धनगर समाज ! पण असे असून देखील आपले सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेची एकोप्याने ठेवन करणारा समाज म्हणजेच - धनगर समाज !
प्रामुख्याने गाई, म्हैस, शेळ्या आणि मेंढ्या अशा दुभत्या जनावरांचे पालन करणाऱ्या या धनगर समाजाचा उल्लेख आजकाल फक्त मेंढपाळ या अर्थाने केला जातोय. मेषपालन करणारा समाज धनगर आहेच पण धनगर शब्दाची व्याप्ती फक्त मेषपालनापर्यंतचीच नाही तर ती दुभत्या पशुपालनापर्यंत आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, दुभत्या जनावरांचे पालन करणारा समाज म्हणजेच धनगर समाज.
इंटरनेटवरील काही उपलब्ध मराठी व हिंदी शब्दकोशातील धनगर शब्दाचा अर्थही खाली देत आहे.
१) धनगर (हिंदी-धंगर) - पुं० [देश०] १. चरवाहा । २. ग्वाला । अहीर । संदर्भ - भारतीय साहित्य संग्रह (http://pustak.org/bs/home.php?mean=26444)
२) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई प्रस्तुत 'महाराष्ट्रीय ज्ञानकोश' मध्ये तर त्यांनी एक लेखच दिला आहे. त्यामध्येही मेषपालन व गोपालन करणारे म्हणजेच धनगर असा अर्थ मिळतो. (http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-43-51/8739-2013-02-15-10-05-57)
३) धनगर - गडरिया, चरवाहा. संदर्भ - 'Glosbe - बहुभाषी ऑनलाइन शब्दकोश' (http://hi.glosbe.com/mr/hi/धनगर)
४) धनगर - गडरिया / चरवाहा. संदर्भ - 'राजभाषा हिंदी शब्दकोश' (http://raj-bhasha-hindi.blogspot.com/2010/03/blog-post_3699.html)
दुभत्या पशुधनाचे पालन करणाऱ्यांना धनगर हा शब्द व्यापक दृष्टीकोनातून वापरावा हीच हा लेख लिहिण्यामागील आशा…
धन्यवाद
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
No comments:
Post a Comment