Saturday, September 23, 2017

मराठी कविता - धनगरी बाणा

सद्य परिस्थितीत महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या न्यायीक मागण्यांच्या पूर्ततेस जो काही विलंब होत आहे, त्या विलंबाबद्दल एका सामान्य धनगराचे मत खालील रचनेतून मांडण्याचा एक प्रयत्न...

दडपविण्याची भीती दाविता, आज तुम्ही हो कोणा रं ?
नेस्तनाभूत होईल राजवट, दाविता धनगरी बाणा रं ।। धृ।।

तलवारीचा इतिहास आमुचा, भीती न आम्हां मरण्याची
रक्ताच्या अखेरी थेंबापर्यंत, हिम्मत आमची लढण्याची
उगीच पुनुरावृत्ती इतिहासाची, करु कशाला देता रं
नेस्तनाभूत होईल राजवट, दाविता धनगरी बाणा रं ।। ०१।।

रास्त मागणी न्यायाची अन, रास्तच पद्धत मागण्याची
विलंब अर्थात नकार ही हो, शिकवण अहिल्या मातेची
पूर्ततेस हो विलंब इतका, आहे असहनीय आम्हां रं
नेस्तनाभूत होईल राजवट, दाविता धनगरी बाणा रं ।। ०२।।

शांततेचा हो अर्थ आमच्या, निर्बलता हा घेऊ नका
उद्रेक होता भावनांचा मग, मैदानातूनी पळू नका 
असंतोष वाढता समाजातला, फारच पडेल महागात रं
नेस्तनाभूत होईल राजवट, दाविता धनगरी बाणा रं ।। ०३।।

राजकारणी खेळ्या खेळूनी, वेळ फुकटच दवडू नका
अन पूर्ततेविना पुढील सत्तेची हो, स्वप्ने तुम्ही पाहू नका
भाव मनातील समाजाच्या हो, मिलिंद येथे मांडतो रं
नेस्तनाभूत होईल राजवट, दाविता धनगरी बाणा रं ।। ०४।।

- मिलिंद डोंबाळे