Saturday, November 30, 2013

Krantiveer Sangolli Rayanna (15 Aug 1798 - 26 Jan 1831)


कविता - वीरांगना भीमाबाई होळकर (Veerangana Bhimabai Holkar)


भारतभूमी अजुनी गाती, शौर्यगीत या वीरांगनेचे
मर्दानी लढली इंग्रजांसवे, रक्षिण्या स्वातंत्र्य देशाचे

शोभे माता लाडाबाई, पिता महाराजा यशवंत
पण कैदेतल्या बालपणाचे, आले नशिबी दुर्भाग्य

महाराजांनी विजयी करुनी, हडपसरचे युद्ध
मुक्त केले जुलमी जाचातूनी, कुटुंब-कबिल्यास

सुटता पुण्यातील कैदेतूनी, सुरुवात झाली शिक्षणास
तलवारबाजी घोडेस्वारी सारख्या, लष्करी प्रशिक्षणास

होता उपवर भीमाई, आनंदे संपन्न झाला विवाह
पती लाभले सरदार बुळे घराण्यातील, गोविंदराव

पण नियतीने योजिला होता, एक नवा वेगळाच डाव
विवाहाच्या फक्त दोनच वर्षांत, माथी आले वैधव्य

पण दु:खाने हताश होईल ती, 'यशवंत-कन्या' कैसी ?
दु:ख सारुनी येऊनी मिळे, पित्याच्या स्वातंत्र्य कार्यासी

देखी तोफांचे कारखाने, होळकरी सैन्याची भरती
अश्व-निवडींवर देखील चाले, नियंत्रण भीमाबाई

सरता थोडा काळ, झाला आणखी एक आघात
हरवले पितृछत्र, महाराजा यशवंत स्वर्गवास

संधी साधून मोक्याची, गोरे फिरंगी प्रयत्न करीती
तरीही जिंकणे अशक्य होती, इंदुरची होळकरशाही

फिरंग्यांनी साधुनी कुटनीती, फोडले अनेक सेनानी
खून तुळसाबाईंचा करुनी, दिले प्रेत नदीत टाकुनी

काही दिवसातच तोंड फुटले, महिद्पुरच्या युद्धाला
पण त्यातही फितुरीचे काटे नडले, होळकरी सैन्याला

युद्धात महिद्पुरच्या, होळकरांनी केली शौर्याची बरसात
पण फितूर झालेल्या गफूरखानाने, रण सोडले ऐन जंगेत

विजय कमळ हातूनी निसटले, झाला तह इंग्रजासंगे
पण भीमाबाई तेथून निसटे, तीन हजार पेंढारी संगे

सदा राहुनी अरण्यवासी, गनिमीकावा मंत्र जपे
फिरंगी भयभीत असती, भीमाबाई करी गनिमी-हल्ले

फिरंग्यांचे खजिने लुटले, केली उध्वस्त अनेक तळे
हल्ले असती अति रांगडे, माल्कमही पळून जाये

पाठवी पत्रे सर्व राजांना, विनंती असे एकत्र लढयाची
प्रतिसाद नसे कोणाचा, तरी चालू ठेविला एकाकी लढा

माल्कमने टाकला मग नवा डाव, केला फितूर रोशनखान
धार नजीक असता तळ, केइरने केला हल्ला तत्काळ

हल्ला झाला चोहोबाजूंनी, पडली एकाकी ही वीरांगना
अखेर झाली कैद, करुनी ठेविले रामपुरा गढीत बंधिस्त

दुर्भाग्य जणू ह्या वीरांगनेचे, मृत्यूही आला कैदेत
विसावला भीमाबाई नावाचा, स्वातंत्र्यासाठीचा झंझावात

ठेऊनी जान त्या कर्तुत्वाची, घ्यावे राष्ट्रकार्य भीमाईचे समजुनी
नमोनि विंनती करे मिलिंद, सर्वांच्या चरणी ! सर्वांच्या चरणी !!

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

Wednesday, November 27, 2013

Veerangana Bhimabai Holkar (17-Sep-1795 To 28-Nov-1858)


भारतभूमी अजुनी गाती, शौर्यगीत या वीरांगनेचे
मर्दानी लढली इंग्रजांसवे, रक्षिण्या स्वातंत्र्य देशाचे

शोभे माता लाडाबाई, पिता महाराजा यशवंत
पण कैदेतल्या बालपणाचे, आले नशिबी दुर्भाग्य

महाराजांनी विजयी करुनी, हडपसरचे युद्ध
मुक्त केले जुलमी जाचातूनी, कुटुंब-कबिल्यास

सुटता पुण्यातील कैदेतूनी, सुरुवात झाली शिक्षणास
तलवारबाजी घोडेस्वारी सारख्या, लष्करी प्रशिक्षणास

होता उपवर भीमाई, आनंदे संपन्न झाला विवाह
पती लाभले सरदार बुळे घराण्यातील, गोविंदराव

पण नियतीने योजिला होता, एक नवा वेगळाच डाव
विवाहाच्या फक्त दोनच वर्षांत, माथी आले वैधव्य

पण दु:खाने हताश होईल ती, 'यशवंत-कन्या' कैसी ?
दु:ख सारुनी येऊनी मिळे, पित्याच्या स्वातंत्र्य कार्यासी

देखी तोफांचे कारखाने, होळकरी सैन्याची भरती
अश्व-निवडींवर देखील चाले, नियंत्रण भीमाबाई

सरता थोडा काळ, झाला आणखी एक आघात
हरवले पितृछत्र, महाराजा यशवंत स्वर्गवास

संधी साधून मोक्याची, गोरे फिरंगी प्रयत्न करीती
तरीही जिंकणे अशक्य होती, इंदुरची होळकरशाही

फिरंग्यांनी साधुनी कुटनीती, फोडले अनेक सेनानी
खून तुळसाबाईंचा करुनी, दिले प्रेत नदीत टाकुनी

काही दिवसातच तोंड फुटले, महिद्पुरच्या युद्धाला
पण त्यातही फितुरीचे काटे नडले, होळकरी सैन्याला

युद्धात महिद्पुरच्या, होळकरांनी केली शौर्याची बरसात
पण फितूर झालेल्या गफूरखानाने, रण सोडले ऐन जंगेत

विजय कमळ हातूनी निसटले, झाला तह इंग्रजासंगे
पण भीमाबाई तेथून निसटे, तीन हजार पेंढारी संगे

सदा राहुनी अरण्यवासी, गनिमीकावा मंत्र जपे
फिरंगी भयभीत असती, भीमाबाई करी गनिमी-हल्ले

फिरंग्यांचे खजिने लुटले, केली उध्वस्त अनेक तळे
हल्ले असती अति रांगडे, माल्कमही पळून जाये

पाठवी पत्रे सर्व राजांना, विनंती असे एकत्र लढयाची
प्रतिसाद नसे कोणाचा, तरी चालू ठेविला एकाकी लढा

माल्कमने टाकला मग नवा डाव, केला फितूर रोशनखान
धार नजीक असता तळ, केइरने केला हल्ला तत्काळ

हल्ला झाला चोहोबाजूंनी, पडली एकाकी ही वीरांगना
अखेर झाली कैद, करुनी ठेविले रामपुरा गढीत बंधिस्त

दुर्भाग्य जणू ह्या वीरांगनेचे, मृत्यूही आला कैदेत
विसावला भीमाबाई नावाचा, स्वातंत्र्यासाठीचा झंझावात

ठेऊनी जान त्या कर्तुत्वाची, घ्यावे राष्ट्रकार्य भीमाईचे समजुनी
नमोनि विंनती करे मिलिंद, सर्वांच्या चरणी ! सर्वांच्या चरणी !!

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

Tuesday, November 26, 2013

कविता - जाणूनी घेऊ महाराजा यशवंत...


किल्ले रायगडवरील हिरकणी बुरुजाची कथा…

मराठी साम्राज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवरील प्रसिद्ध हिरकणी बुरुजाची सत्यकथा...


छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला. १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न झाला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ह्या किल्ल्याची बांधनी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगली होती. २७०० फुट उंची असलेल्या ह्या गडावर दरवाज्यांखेरीज कोणताही येण्याजाण्याचा मार्ग नव्हता. असे म्हंटले जायचे की - 'रायगडाचे दरवाजे बंद झाले की, खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी'. पण ह्या गोष्टीला अपवाद ठरणारी एक स्त्री म्हणजेच - 'हिरकणी' 

किल्ले रायगडाच्या खाली काही अंतरावर वाकुसरे (वाळूसरे) नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक धनगर व्यक्तीचे कुटुंब राहत होते. घरात त्या व्यक्ती समवेत त्याची आई, बायको हिरा व त्यांचे एक तान्हे बाळ राहत असे. घरातील दुभत्या गायी-म्हैशींचे दूध विकून मिळणाऱ्या पैश्यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्याची बायको रोज सकाळी गडावरती दूध विकण्यास जात असे. एके दिवशी रोजच्याप्रमाणे हिरा गडावर दूध विकण्यास गेली, पण तिला त्या दिवशी काहीएक कारणाने दरवाजापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. ती गडाच्या दरवाजांजवळ आली, पण पाहते तर काय दरवाजे बंद झालेले होते. गडकऱ्यांना तिने फार विनंती केली, पण त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला. कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले कि, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत. छत्रपतींची ही आज्ञा सर्वांना लागू होती. कोणालाही त्यासाठी मुभा नसे. पण हिराला आपल्या तान्ह्या बाळाची चिंता लागली होती. आईवाचून ते तान्हे बाळ रात्रभर कसे राहील, ह्या विचाराने त्या आईची चिंता वाढतच चालली. ह्या विचारातच हिराने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्याच्या बरोबरीचे होते. कारण सर्वत्र खोल दऱ्या, दाट झाडे-झुडपे आणि त्यात अंधार. पण बाळाच्या प्रेमापोटी ह्या मातेने हा निर्णय घेतला. गडाच्या कड्यांचे निरीक्षण केले. एका कड्यावर येऊन पोहोचली आणि त्याच कड्यावरून खाली उतरली. खाली पोहोचूपर्यंत मात्र सभोवतालच्या झाडा-झुडपांमुळे अंगावर अनेक ठिकाणी ओरबडल्याने रक्त आलेले होते. त्याच अवस्थेत गड उतरून ती आई आपल्या घरी परतली. घरी परतताच पहिल्यांदा त्या आईने आपल्या बाळाला कुशीत घेतले. बाळाच्या दर्शनाने त्या आईला जो आनंद झाला, तो मात्र जखमांच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता.

ही घडलेली गोष्ट जेव्हा महाराजांना कळली, तेव्हा ते अत्यंत अश्यर्यचकित झाले. कारण शत्रूच्या सैन्यालाही दरवाजातून येण्या-जाण्या शिवाय मार्ग उपलब्ध नसणाऱ्या रायगडावरून एक स्त्री खाली कशी पोहोचली. हा प्रश्न महाराजांसहित सर्वांनाच अन्नुतरीत होता. महाराजांनी हिराला गडावर बोलावण्यास सांगितले. हिरा गडावर आली, ती आल्यानंतर महाराजांनी तिला ह्या सर्व घटनेविषयी विचारले असता, हिरकणीने महाराजांना घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला व आपल्या तान्ह्या बाळाला भेटण्यासाठी हा एकच मार्ग उपलब्ध होता असे सांगितले. हे ऐकून त्या शूर मातेचा महाराजांनी साडी-चोळी देऊन सन्मान तर केलाच पण ज्या कड्यावरून ती खाली उतरली त्या कड्यावर आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून एक बुरुज बांधण्यात आला. तो बुरुज म्हणजेच रायगडावरील 'हिरकणी बुरुज'. त्याचबरोबर ती राहत असलेल्या गावाला तिचे नाव देण्यात आले. ते गाव म्हणजेच रायगडाजवळील 'हिरकणीवाडी'. सध्या रायगडावर जाण्या-येण्यासाठी बनवण्यात आलेला रोपवे (Ropeway) हा त्याच 'हिरकणीवाडी'तून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हिरकणीवर उपलब्ध असलेली प्रसिद्ध जुनी कविता येथे देत आहे.

रायगडावर राजधानी ती होती शिवरायांची ।
कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी बुरुजाची ।

वसले होते गाव तळाशी वाकुसरे या नावाचे ।
राहात होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे ।

आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे ।
शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे ।

सांज सकाळी हिरा जातसे दूध घेऊनी गडावरती ।
चालत होती गुजराण त्या नेकीच्या धंध्यावरती ।

एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली ।
ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज टळूनी गेली ।

सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे ।
मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळ तान्हे माझे ।

हात जोडूनी करी विनवणी म्हणे जाऊद्या खाली मला ।
गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला ।

बाळाच्या आठवे झाली माय माउली वेडिपीसी ।
कडा उतरूनी धावत जाऊनी बाळाला ती घेइ कुषी ।

अतुलनीय हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले ।
साडी चोळी हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले ।

कड्यावरी त्या बुरूज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची ।
ऐकू येते कथा अजुनी अशी हिरकणी बुरूजाची ।

हिरकणीची ही शौर्यगाथा अजही रायगडावर सांगितली जाते आणि तो हिरकणी-बुरुज आईच्या प्रेमाची साक्ष देत आजही रायगडावर तटस्थपणे उभा आहे. एका शूर मातेची कथा सर्वांपर्यंत पोहोचावी एवढाच हा लेख लिहिण्यामागील स्वार्थ…

धन्यवाद
मिलिंद डोंबाळे

२६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रध्दांजली…


Monday, November 25, 2013

Chhatrapati Shivaji Maharaj


आठवणींच्या हिंदोळ्यावर - ००१ (एक अविस्मरणीय मुलाखत)

मी आणि माझे जिवलग मित्र ज्ञानेश्वर गायकवाड यांनी २००९ मध्ये घेतलेल्या, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या मुलाखतीची हि आठवण. सदर मुलाखतीस शिवाजी विद्यापीठातर्फे 'वार्षिक नियतकालीन स्पर्धा २००९' मधील मुलाखत विभागातील प्रथम पारितोषिक मिळाले होते. 

(मुलाखती मधील एक क्षण...)
जीवनाला महत्वपूर्ण वळण देणारे आमचे महाविद्यायीन दिवस अखेरच्या टप्प्यात होते. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षातील दुसऱ्या सत्रात पदार्पणही झाले होते. अतिशय खेळीमेळीमद्धे घालवलेल्या साडे तीन वर्षांनंतर मनातील चल-बिचल, शिक्षणानंतरची वाटचाल ह्याबद्दलचे विचार मानामद्धे अधून मधून डोकावत असत, पण मित्रांच्या सहवासात ते विचार पुन्हा कोठेतरी अदृष्य होत असत (पण शेवटच्या वर्षात असे विचार मनात येण्याचे प्रमाण थोडेसे वाढले होते, हे मात्र नक्की). भारतीय सणांप्रमाणेच एका मागून एक येणारे हे महाविद्यालयीन 'कार्यक्रम' असतात. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येतो तो म्हणजे - वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम (आता कोणत्याही विद्यार्थ्याला 'ह्या' दिवसांचे महत्व सांगण्याची गरज असेल असे मला तरी वाटत नाही). आमचा सर्व कार्यक्रमात सहभाग तर नेहमीप्रमाणे होताच. खूप धम्माल, मजा-मस्ती झाली आणि त्यनंतर सुरु झाल्या सदर वर्षीच्या - वार्षिक नियतकालीन प्रकाशनच्या घडामोडी.

प्रकाशनासाठी प्राध्यापकांची नियुक्ती आटोपल्यानंतर वेळ आली ती विविध विभागासाठी विध्यार्थी प्रतिनिधी निवडण्याची. मी, ज्ञानेश्वर आणि आमच्या सोबतच्या बऱ्याच मित्रांची विविध विभागासाठी नियुक्ती करण्यात आली. असे विविध छोटे-मोठे प्रसंग आजही तसेच्या तसे आठवतात, पण त्यातील महत्वाची एक आठवण सांगावीशी वाटते ती म्हणजे, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांची मुलाखत.

प्रकाशनासाठी प्रत्येकाच्या विविध गोष्टी सुरु होत्याच, कोणी नवीन काही लिहून देण्यास इच्छुक तर कोणी आपला 'Copy-Paste' जिंदाबाद… अश्यातच आम्हाला सांगण्यात आले की, एक चांगली मुलाखत आपल्याला ह्या वर्षीही प्रकाशित करावयाची आहे. त्यासंदर्भातील चर्चेनंतर ह्या वर्षी पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी (आण्णा) यांची मुलाखत घेण्याचे ठरले आणि ते काम सोपविण्यात आले मिलिंद डोंबाळे व ज्ञानेश्वर गायकवाड ह्या दोन विद्यार्थ्यांवर. सदर प्रश्नावलीसाठी श्री. पी. डी. कुलकर्णी सरांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. ज्ञानेश्वरचे शिक्षण हे वाळव्याला झाले असल्याने, त्याला पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी (आण्णा) यांच्या बद्दल सर्व माहिती होतीच पण प्रश्न होता त्यांच्या वेळेचा, कारण वृद्धापकाळाने ते जास्त कोणाशी भेटत नसत. अश्यावेळी आम्हांला मदत मिळाली ती ज्ञानेश्वरच्या वाळव्यातील श्री. पाटील सरांची.

मुलाखतीचा दिवस ठरविला गेला. मी आणि ज्ञानेश्वर आमची हिरो-होंडा (स्प्लेंडर प्लस) घेऊन आष्टयाहून वाळव्याला निघालो (ह्या हिरो-होंडा (स्प्लेंडर प्लस) चे एक वैशिष्ट म्हणजे, ह्याचे खरे मालक होते ते आमचे 'परममित्र' राहुल गाजी, परंतू हे वाहन दुधगाव वरून आष्टयाला आल्यावर त्याचे 'मालक' बदलले जायचे. नवीन मालक असायचे मिलिंद, ज्ञानेश्वर, विनोद, परेश आणि …. ) वाळव्यात पोहोचताच श्री. पाटील सरांची भेट घेतली व हुतात्मा संघाच्या कार्यालयाकडे निघालो. थोड्याच वेळात आम्ही कार्यालयात पोहोचलो. तेथील कर्मचार्यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर आम्हाला एक एक दुधाचा पेला पिण्यास दिला. आण्णांना ही आत माहिती देण्यात आली आणि आम्हाला आण्णांच्या खोलीत जाण्याची परवानगी मिळाली. आण्णा ही थोड्या वेळात तेथे आले. वृद्धापकाळाने थोडी झुकलेली पण भरभक्कम आकृती आम्हासमोर अवतरली. आण्णांचे  सुरवातीचे प्रश्न आम्हांला अनपेक्षित होते ते म्हणजे - जेवण केलात का ? (आम्ही जेवण करूनच आल्याचे सांगितल्या नंतर) दुध पिलात का ? (पुन्हा आम्हाला कळले की तिथे आलेल्या सर्वाना मोफत दुध व जेवण उपलब्ध असते) आम्ही होकारार्थी मान हलवल्यावरच आण्णांनी पुढील गोष्टीस सुरवात केली. मुलाखतीस सुरवात झाली, मी माझ्या मोबाईल मध्ये देखील त्याचे रेकॉर्डींग सुरु केले. १५ जुलै  १९२२ या जन्म दिवासापासूनचे एकामागून एक प्रसंग आण्णा आम्हांला सांगत होते. अनेक मुद्धे जसे कि बालपण, सहकार चळवळ, इंग्रजांच्या खजिन्याची लुट, सध्याचे सामाजिक परिस्थिती, नाना पाटील यांचे कार्य, पाणी परिषद, स्वातंत्र्य लढ्यातील अविस्मरणीय प्रसंग  अशा अनेक प्रसंगांची पूर्ण माहिती त्यांनी आम्हांला दिली. त्यांच्या ह्या कार्यामागील प्रेरणास्थान होत्या त्या त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई. एकेक प्रसंग ऐकून आम्ही खरच रोमांचित होत होतो. जवळपास एक तासाच्या वर चाललेल्या ह्या मुलाखतीत आण्णांनी त्यांचे संपूर्ण जीवन सांगितले. अनेक आघात, त्याग, देशप्रेम अश्या विविध गोष्टींनी भरलेले त्यांचे ते जीवन होते. त्यांनी दिलेला हा संदेश - 'कोठेही राहिला तरी जीवनात प्रामाणिक रहा व प्रामाणिक लोकांच्या साथीने अन्यायाविरुद्ध संघर्ष करा' अजूनही ते आण्णांचे बोल आठवतात. मुलाखत संपल्यावर आण्णांना नमस्कार करून आम्ही आष्टयाला परतलो. पण ते देशप्रेमाचे बोल मात्र मनात आणि डोक्यात घुमत होते.

थोड्याच दिवसांत आमच्या महाविद्यालयाचा वार्षिक अंक प्रकाशित करण्यात आला. त्या पूर्ण अंकासही विद्यापीठातर्फे प्रथम पारितोषिक मिळाले व आमच्या ह्या मुलाखतीला ही. पण काही क्षण मात्र न विसरण्यासारखेच असतात अशातलाच हा...

हे सर्व घडून पाच वर्षे होत आली पण आठवणी मात्र जश्याच्या-तश्या डोळ्यापुढे उभारतात. ह्या आठवणींत आपणांस ही  सहभागी करून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न…

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)