Tuesday, November 26, 2013

कविता - जाणूनी घेऊ महाराजा यशवंत...


1 comment:

  1. "तो राजा नव्हता...तो होता जनांचा धीर
    तो लढला अविरत...न एके जागी स्थिर
    त्यागली राजसुखे अन राजभोगही त्याने
    स्वातंत्र्यास्त व त्यागले प्राणही असा तो वीर...
    ज्या भुमीवर त्याच्या अश्वाचा टापा पडल्या
    आजही थरथरते ती मायभुमी पुत्र-प्रेमात
    ठिबकले रक्त जेथ-जेथ संघर्षरत या पुत्राचे
    त्या भुमीत अजुनही गाती कण-कण महागीत!
    ती प्रियपत्नी अन प्रियकन्या कैदेत...अन बंधुंची निर्दय हत्या...
    रामासही असले दुर्दांतदु:ख कोठुन?
    सोडवण्या त्यांना रावणसम दैत्यांपासुन
    पर्याय अन्य कोणता युद्धावाचुन?
    तो यशवंत होता म्हणुनी वाचली ही लंका
    जन-स्नेही होता म्हणुनी त्रिखंडी वाजतो डंका
    पुण्यात क्षमेची उठली राने...स्नेह आवाहने...
    पण येथील रावण पळपुटा..इंग्रजा ं मिळे मैत्र भावाने...
    "इंग्रजा काय तुझी मत्ता...कोठुन आणशी येथे सत्ता?
    पेशव्या पळवले असले तरी तु दुर, पण नको राहु मगरुर
    मी हाणील तुझ्या बेताला, तुझ्या हेतुला...हो सावध रे जलचरा
    यशवंत म्हण्त्यात मला...तु देशाचा दुश्मन खरा...जय मल्हार..."
    मग यशवंत जाहला धीरवीर...विसरला व्यक्तिगत अपमान
    गिळली दु:खे, उरी झंझावात पेटला घनघोर
    मग भडकला वणवा असा कि जलचरांचा मिटला अभिमान
    असा थोर महावीर होवुन गेला या धरतीवर, बसे विश्वास?
    तांडवात आडवे होती व्रुक्ष तसे इंग्रज यशवंताहाती
    हर युद्धात जलचरांनी खाल्ली माती बसली धास्ती
    तहाची भीक मागुनी म्हणे करा आम्हाशी मैत्र
    यशवंत म्हणाला "बघतोच राहता इथे कसे सुखनैव?"
    स्वातंत्र्याची पहिली ज्योत पेटवुन विसावला वीर
    एकाकी लढा जाहला तरी विजयांची केली बरसात
    ती स्म्रुती उरेल चिरकाळ...काळावर करुनी मात
    गड्यांनो नित्य बोला"जय यशवंत..."
    "हरेक ह्रुदयात जागो यशवंत
    व्हावेत जन तसेच प्रज्ञावंत
    मायभुमीवर तसेच राहो प्रेम
    जीवनयुद्धात व्हावे यशवंत!
    ही त्या राष्ट्रवीराचीहाक
    "करा राष्ट्र महा-यशवंत!"
    बोला जय यशवंत!
    -संजय सोनवणी

    ReplyDelete