Friday, January 3, 2014

Krantiveer Sangolli Rayanna (क्रांतिवीर संगोळी रायन्ना)

(15 August 1798 – 26 January 1831) 

क्रांतिवीर संगोळी रायन्ना या स्वातंत्र्ययोद्ध्याचा जन्मदिवस (१५ ऑगस्ट) पुढे जाऊन भारताचा स्वातंत्र्य दिन ठरावा आणि प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या वीराला ज्या दिवशी फाशी देण्यात आली तो दिवस (२६ जानेवारी) पुढे जाऊन भारताचा प्रजासत्ताक दिन ठरावा यासारखा एकमेव्द्वितीय योगायोग म्हणजे जणू भारत-भारतीने आपल्या वीरपुत्रास देलेली आदरांजलीच म्हणावी लागेल.

क्रांतिवीर संगोळी रायन्ना म्हणजेच कित्तूर संस्थानचे सरसेनापती ! तलवारीच्या टोकावर इंग्रजांना आव्हान देणारा महायोद्धा ! स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन, फासावर जाणारे स्वातंत्र्यवीर ! मरण समोर असताना देखील पुन्हा जन्म घेऊन इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त करणारे भारतमातेचे सच्चे वीरपुत्र होय.

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)​

No comments:

Post a Comment