Friday, March 25, 2016

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि होळकर महाराजे

काही दिवसांपासून 'फर्ग्युसन कॉलेज, पुणे' मधील 'जमीन आणि मदत' या विषयांवर सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यामध्ये आणखीन एका मुद्द्याचा समावेश मी करु इच्छितो तो म्हणजे - तत्कालीन होळकरशाहीचे राजे, महाराजा शिवाजीराव होळकर (११ नोव्हेंबर १८५९ - १३ ऑक्टोबर १९०८) यांनी डेक्कन एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक मदत केली होती. तसेच फर्ग्युसन कॉलेजसाठी कोणतीही अट न घालता पुण्याचा होळकरांचा पिढीजात वाडा स्वतः होऊन देऊन टाकला होता.

होळकरशाहीचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश मतकर त्यांच्या प्रबंधात लिहितात - "लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर या लोकसेवारत विद्वानांना इंदूरात समक्ष बोलावून आणि त्यांचा यथोचित सत्कार करुन त्यांच्या शैक्षणिक चळवळींना अपेक्षेबाहेरचे अर्थसाहाय्य केले. फर्ग्युसन कॉलेजकरिता कुठलीच अट न घालता आपला पुण्यातील पिढीजात वाडा आपण होऊन देऊन टाकला." (संदर्भ : होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास - डॉ. गणेश मतकर, पृष्ठ-२९२)

याव्यतिरिक्त, महाराजा शिवाजीराव होळकर यांच्यानंतर गादीवर आलेल्या महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांनी सुद्धा ही परंपरा सुरुच ठेवली. महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या बायो-लॉजिकल लायब्ररीकरिता १९१५-१६ मध्ये २०,००० रुपयांची भरघोस आर्थिक मदत केली. (संदर्भ : होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास - डॉ. गणेश मतकर, पृष्ठ-३२७)

पण, सध्याच्या एकाही चर्चेत महाराजा शिवाजीराव होळकर आणि महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांचे साधे नाव देखील घेतले जात नाही.

काय म्हणावे ? काय करावे ? चालू द्यावे…

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com

1 comment:

  1. मिलींदजी याला जातीव्देष म्हणतात. महाराष्ट्रातील धनगर ही आदिम जमात आहे. अतिशय प्रगतशील या जमातीला षंडयंञाने जाणीवपूर्वक मागासबनविण्याचे काम इथल्या उपरे असलेल्या व्यवस्थेने केले व ते आजही चालू आहे .धनगरांची मालमत्ता, ताकत, मेहनत, बुद्धी सर्व इतरांना हवी आहे. पण धनगर माञ नको ही प्रवृत्ती आजही जोमाने कार्य करते. आपला मागील एक लेख वाचला. धनगरांची पोर जातीयव्देष पसरवत आहेत असा आपला आरोप आहे. इतकी वर्ष तुम्ही हिंदु धर्मात आहात. या धर्माचा गुरू तुम्हाला अंगाला हात लावू देत नाही. तुमच्या पंगतीला जेवत नाही किंवा तुमच्या घरातल पाणीही पीत नाही. याला काय म्हणताल तुम्ही? एखाद्या व्यक्तीने दुसर्राला फसवले. तुमचे म्हणणे फसणारा दोषी. कारण तो अज्ञानी असल्याने फसला. याचा अर्थ ज्ञानी माणसाला फसविण्याचा परवाना मिळाला काय?ज्या जातीने गांजले तिला दोषी ठरवले बिघडले कोठे? ईश्वरांने निर्माण केलेली सर्व माणसे सन्मान मग काही स्वत:ला श्रेष्ठ समजतात कसे? एकाने धर्म सांभाळायचा.एकाने सत्ता. इतरांनी मग काय करायचे घंटा? शञू क्लीअर असावा त्यामुळे लढाई सोपी होते. तरूणांना ते करू द्या. क्रमश: जय मल्हार!

    ReplyDelete